shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांगला अभ्यास करून मोठे व्हा आई-वडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा - शेखर पानसरे.

चांगला अभ्यास करून मोठे व्हा आई-वडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा - शेखर पानसरे.

निमसाखर येथील जाधव मळा व कारंडे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक देऊन केले स्वागत.

इंदापूर प्रतिनिधी: शाळेचा पहिला दिवस म्हणजे  इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेत शाळे मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागताचा जल्लोष  बुधवार दिनांक १५ जून २०२२ रोजी विविध शाळेच्या प्रांगणात दिसून येते असेच कोरोना नंतर दोन वर्षाने शाळा सुरू झाल्या . सध्या  वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येमुळे शाळा सुरू होण्याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र आणखी शैक्षणिक नुकसान नको म्हणून शासनाने शाळा सुरू करण्यावर ठाम भूमिका घेतली आणि आज शाळा सुरू झाल्या.
निमसाखर येथील  जाधव मळा व कारंडे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे निमसाखर ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे व ग्रामस्थ शंकर जाधव यांनी उपस्थित राहून मुलांचे स्वागत केले तसेच  सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक वाटप केले.

 यावेळी  सदस्य शेखर पानसरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  शुभेच्छा व्यक्त  करताना म्हटले की,चांगला अभ्यास करून मोठे व्हा आई-वडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

 यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळा जाधव मळा मुख्याध्यापक सुधाकर नाचन ,उपशिक्षक पंकज रणवरे, अंगणवाडी  सौ रकटे मॅडम,उपस्थित होते.


जिल्हा परिषद शाळा कारंडे वस्ती मुख्याध्यापक सौ सय्यद मॅडम, उपशिक्षक मंगेश शेंडे  तसेच हनुमंत कारंडे, बाळासाहेब कारंडे ,सुरज पवार, गणेश कारंडे,
गजानन कारंडे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या .
close