shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आम आदमी पार्टीच्या प्रयत्नाला आले शेवटी यश ! आश्वासनानंतर ११व्या दिवशी उपोषणाची सांगता !


चंद्रपूर◼️ किरण घाटे◼️

घूग्घुस येथे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आम आदमी पार्टीच्या उपोषणाला शेवटी अकराव्या दिवशी यश प्राप्त झाले. लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा मागील कित्येक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या घुग्घुस येथील बाजूच्या मार्गावरून जड वाहनांची अवैध रित्या वाहतूक केल्या जात होती या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून आम आदमी पार्टी  सतत लढा देत होती परंतु याकडे प्रशासना कडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात होते.ही बाब लक्षात घेता आम आदमी पार्टीने 07 जून 2022 रोजी साखळी अन्नत्याग उपोषण आरंभ केले व ते उपोषण सतत 11 दिवस चालले  नंतर  चंद्रपूरचे प्रभारी तहसीलदार राजू धांडे  यांनी या बाबतीत दि. 16 जून 2022 रोजी  एक बैठक बोलावली या बैठकीत  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,घूग्घुस  पोलिस स्टेशन ठाणेदार बबन पुसाटे, लॉईडस मेटल कंपनीचे अधिकारी व आम आदमी पार्टी चंद्रपूर व घुग्घुसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी नंतर उपोषणाच्या 11 व्या दिवशी प्रभारी तहसीलदार यांनी मागण्या सोडविण्या संदर्भात एक लेखी पत्र दिले. उपोषणात सहभागी असलेले आम आदमी पार्टी घुग्घुस शहर सहसंघटनमंत्री आशिष पाझारे यांना  निंबु शरबत पाजुन या उपोषणाची सांगता झाली◼️ 







◼️आम आदमी पार्टी द्वारा करण्यात आलेल्या मागण्या अश्या01) सध्या जड वाहतुकीस वापरत असलेला अवैध मार्ग त्वरित बंद करावा. (02) प्राथमिक आरोग्य केंद्रा बाजूला असलेले नियमबाह्य जड वाहनांची पार्किंग तात्काळ बंद करावी. (03) जड वाहतुकी साठी नियमा नुसार शासनाने दिलेला कंपनीने पाठीमागच्या मार्गाचा वापर करावा या प्रमुख मागण्या होत्या◼️

◼️उपरोक्त मागण्या मान्य करण्यात आल्या असून येत्या 10 दिवसांमध्ये या सर्व मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन देण्यात आले आम आदमी पार्टी घुग्घुसचे शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी सांगितले की येत्या 10 दिवसांमध्ये या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 11 व्या दिवसा पासून आम आदमी पार्टी द्वारा आमरण उपोषण करण्यात येईल . सोबतच लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी मध्ये सुरजागढ वरून येणारा आयरण स्पंज हा ओव्हरलोड येत असल्यामुळे यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कडून  देण्यात आले.

 यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखांडे, जिल्हा युवा अध्यक्ष मयुर राईकवार,चंद्रपूर महिला शहर अध्यक्ष ऍड. सुनीता पाटील शहर अध्यक्ष अमित बोरकर,भद्रावती शहर सचिव सुमित हस्तक, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे,  महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई,रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धनविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे आदीं उपस्थित होते.

close