shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉयड्स कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला आग !

आग विझविण्याचे कार्य सुरूच..!

चंद्रपूर-▪️ किरण घाटे▪️ -
चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्घुस येथील लॉयड्स मेटल कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला आज शनिवार दि.18 जून रोजी सायंकाळी 6  वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली .



त्यामुळे आगीचे धूर मोठ्या प्रमाणात निघू लागले होते. लवकरच आगीने रौद्ररूप धारण केले . या घटनेची माहिती मिळताच  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व घुग्घुस पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ  घटनास्थळी धाव घेतली 
लगेच अग्नीशमन दलाच्या पथकाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे घटनास्थळी दिसुन आले.

यात सुदैवाने कोणतीही प्राण हानी झाली नसून ट्रान्सफॉर्मर पूर्णतः जळाल्याने कंपनीचे  मोठे नुकसान झाले आहे. हे  वृत्त लिहे पर्यंत आग विझविण्याचे काम सुरुच होते.
close