shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विशाल धनवडे मृत्यू प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करावा ; दयानंद इरकल

जालना । विशेष प्रतिनिधी (रमेश जेठे) -  मागील महिन्यात सोमवार दिनांक ९  मे २०२२ रोजी वाटुर फाटा येथील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात विशाल धनवडे वयवर्ष १९ याचा मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणी त्याने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या मृत्यूप्रकरणी फिर्याद देणाऱ्या त्याच्या भावाचे म्हणणे योग्यरीतीने ऐकून न घेता संबंधित पोलिस प्रशासनाने आपले आर्थिक हित जोपासत उलट आरोपींंनाच मदत करत वाटुर फाटा येथील विशाल धनवडे याने आत्महत्या केल्याचे भासवत सदर आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गावातील कैलास माने यांच्या सोबत विशाल धनवडे याचा नेहमी वाद होत होता आणि विशाल धनवडे याला कैलास माने यांने यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिलेल्या होत्या. विशाल धनवडे याने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी सातत्याने केला आहे. कारण विशाल धनवडे हा उत्तम प्रकारचा पोहणारा होता.जुन्या भांडणाच्या वादावरून त्याला गावातील कैलास माने यांनी मोटर आपल्या सायकलवर बसून घेऊन जाऊन त्याचा खून करून शेततळ्यात टाकले असल्याचा आरोप त्यांचे वडील कल्याण धनवडे यांनी केला आहे,
सदरील प्रकरणातील आरोपींनी संबंधित पोलिस प्रशासनाशी मोठ्या प्रमाणात आर्थिक हीत जोपासत रसद पुरवून आत्महत्या केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोपही केला जात आहे,म्हणून सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून ही आत्महत्या नव्हेतर हत्याच असल्याने संबंधित आरोपींवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी दि.७ जून २०२२ रोजी वडार पॅंथर संघटनेचे अध्यक्ष दयानंद इरकल यांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनाची दखल न घेतल्यास समस्त वडार समाज आणि वडार समाज संघटना राज्यभर तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडतील असा इशाराही त्यांनी आपल्या या निवेदनात दिला आहे.
close