shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या 12 वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा*

*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या 12 वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा*
     इंदापूर प्रतिनिधी:हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचा आज  ऑनलाइन बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' कोरोना कालखंडानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा घेण्यात आल्या. ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रयत्न करून या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे तसेच काही विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण संपादन करून नावलौकिक प्राप्त केला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जे विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले असतील त्यांनी देखील न खचून जाता येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून सामोरे जाऊन यश संपादन करावे.करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या क्षेत्राचा विचार करून विद्यार्थ्यांनी शिक्षण क्रमाची निवड करावी.'
close