shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉईडस मेटल कंपनी विरोधात आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण सुरु!



घूग्घुस (चंद्रपूर)-◼️किरण घाटे ◼️-
 
घूग्घुस शहरा समिप असलेल्या लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा मागील कित्येक वर्षांपासून घुग्घुस शहरातील मुख्य मार्गाचा वापर या कंपनी द्वारा केला जात आहे. परंतु लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनीला शासन नियमानुसार देण्यात आलेला मार्ग हा दुसरा आहे . तो मार्ग न वापरता कंपनी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाजूकडील मुख्य मार्गाचा अवैध रित्या सातत्याने वापर करीत आहे. 


लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनीने घुग्घुस शहराला प्रदूषणामध्ये अव्वल स्थान मिळवून दिले आहे सोबतच या मार्गावरून कंपनीच्या जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शहरातील प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे तिथेच बाजूला लागून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथेच कंपनीच्या जड वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग होत आहे ज्यामुळे तिथे येणाऱ्या नागरिकांना प्रदूषणाचा  सामना करावा लागतो तदवतचं रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरोदर माता, नवजात शिशू व इतर रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. 
      
ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा संबंधित विभागाला मागील काही महिन्यांपासून वारंवार निवेदन देण्यात आले परंतु यावर अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे काल दि. ७जूनला जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वात  शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी ,जिल्हा सचिव संतोष दोरखंडे यांच्या उपस्थितीत उपोषणास सुरुवात झाली आहे.  

त्यांचे प्रमुख मागण्या या प्रकारे (०१) सध्या जड वाहतुकीस वापरत असलेला मार्ग त्वरित बंद करावा.(०२) प्राथमिक आरोग्य केंद्रा बाजूने सुरू असलेली नियमबाह्य जड वाहनांची पार्किंग त्वरित बंद करावी. (०३) जड वाहतुकी करीत नियमानुसार शासनाने दिलेला कंपनीने पाठीमागचा मार्गाचा वापर करावा. (०४) दमारोग, हृदयविकार, कर्करोग इत्यादी रोगाने ग्रस्त असलेल्या कंपनीतील कामगारांना उपचारासाठी मोफत सवलत देण्यात यावी. 
   
यावेळी उपोषण मंडपात महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, उपाध्यक्ष सोनम शेख, सचिव विपश्यना धनविजय, घुग्घुस शहर सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, प्रभाग क्रमांक ६ चे अध्यक्ष प्रफुल पाझारे, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, संघटनमंत्री पुनम वर्मा, अनुप धनविजय, अनुप नळे, रवी शंतलावार, प्रशांत सेनानी, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, 

रिना पेरपुल्ला, शामला तराला, धम्मदिणा नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, नसीम शेख, सद्दाम शेख, अंकुश ऊईके  उपस्थित होते.
close