shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंदना ढवळेंना पत्रकार उत्कर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!


◼️चंद्रपूर◼️ किरण घाटे◼️
बुलढाणा येथील सुपरिचित साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या वंदना ढवळे यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पनवेल येथील पत्रकार उत्कर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
 

◼️पत्रकार उत्कर्ष समिती ही महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी कार्यरत संस्था असून या समिती मार्फत समाजातील विविध समस्यांवर लेखणीच्या माध्यमातून शासन , प्रशासन व समाज यांच्यातील दुवा साधत सामाजिक हित व समतोल राखण्यासाठी धागा बनून निरंतर प्रयत्न केला जातो. समिती मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत समाज रत्नांचा गौरव करण्यात येतो .वंदना ढवळे ह्या अशाच रत्नांपैकी एक असून समितीतर्फे दिल्या जाणारा शिक्षक पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
  
सदरहू पुरस्कार सोहळा दि.१२ जून रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्‍यात येणार आहे.
 
पुरस्कार मिळाल्याबद्दल वंदना ढवळे यांचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
close