नेवासा ( कमलेश शेवाळे) - इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स,अ यांच्या बद्दल बीजेपी प्रवक्ता नूपुर शर्मा व नवीन जिंदल यांनी अपशब्द् वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवाल्या याचा विरोध पूर्ण भारत देशातून होत आहे त्यामुळे अश्या गलिच्छ विचार ठेवणाऱ्या समाज द्रोहींना अटक करावी जेणेकरून कोणीही असे वक्तव्य करणार नाही व आपल्या देशाचे वातावरण शांत राहिल या अनुशषंगाने दि. १०-६-२०२२ रोजी समस्त मुस्लिम बांधव सोनई यांच्यावतीने सोनई पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
यावेळी सोनई पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी निवेदन स्वीकारले व आश्वासन दिले की, हे निवेदन वरिष्ठांकड़े पाठविण्यात येईल व दोषींवर योग्य ती करवाई करण्यात् येईल ,निवेदन देण्यासाठी आज़ाद सामजिक प्रतिष्ठान सोनईचे अध्यक्ष नजीर हसन सय्यद,ऍड.जमीर शेख, फिरोजभाई पठाण ,शाही ईमाम हाफिज जाफर, मौलाना सलीम, मौलाना अय्यूब ,हाफिज समीर, हाफिज वसीम,हाफिज निशात, फारूक पठाण,नसीर शेख, इरफ़ान शेख यांच्यासह सोनई तमाम समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते.

