न्याहाळोद : येथील सानेगुरुजी विद्यालयातील निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम क्रमांक यश पवार तर द्वितीय क्रमांक शर्वरी पवार हिने मिळवला आहे.
. न्याळोद येथील साने गुरुजी महाविद्यालयाचा निकाल नुकताच लागला असून त्यात माजी पंचायत समिती सदस्य विकास पवार यांचे चिरंजीव यश पवार याने बारावीत 91 टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केले असून तर द्वितीय क्रमांक दिवंगत जिल्हा परिषद सदस्य अरविंद पवार यांची नात तर माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पवार यांची मुलगी शर्वरी मुकेश पवार हिने 86 .83 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे,
संस्थेचे चेअरमन राम भदाणे, मनोहर भदाणे शाळेचे मुख्याध्यापक ए टी पवार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

