शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी व परिसरातील भाविक भक्तांना आनंदाची बातमी शिर्डी माझे पंढरपुर साई बाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला किर्तन सोहळा शिर्डी येथे व्हावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे असा दृष्टांत देखील काही भक्तांना झालाय तो अनुभव साईभक्तांनी परम साईभक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय भाऊ यांना सांगितला व हा साईबाबांचा आदेश समजून विजू भाऊंनी ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशी ला कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल असे विजू भाऊंनी सांगितले.
शनिवार दिनांक 11/6/2022 रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता कीर्तन सोहळा होणार आहे कीर्तनाचे ठिकाण विजुभाऊ कोते यांच्या वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी व शिर्डी ग्रामस्थांनी सोहळ्यातील कीर्तन श्रावणाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली. सातवी कीर्तनाची सेवा गुरुस्थान नगर येथील रहिवाशी यांच्यावतीने होईल असे विजुभाऊ यांनी सांगितले.

