shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कॅन्टोन्मेंट नाक्यावर राडा ! भिंगार कॅम्प पोलिसांत सात जणांविरूध्द गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 बुधवार दिनांक १५ जून २०२२

कॅन्टोन्मेंट नाक्यावर राडा ! भिंगार कॅम्प पोलिसांत सात जणांविरूध्द गुन्हा दाखल..!!

अहमदनगर : नगर-जामखेड रोडवरील कॅन्टोन्मेंट नाक्यावर राडा झाला असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
रवी उर्फ धरम मुन्नु स्वामी (वय 45 रा. सदर बाजार भिंगार, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल काळे, संदीप म्हस्के, संतोष काळे, शुभम काळे, तुषार काळे, स्वप्नील काळे, सुरज शेळके यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत फिर्यादी रवी स्वामी जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी स्वामी नगर-जामखेड रोडवर असलेल्या कॅन्टोन्मेंट नाक्यावर गार्डचे काम करतात. सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान आठ जणांनी नाक्याची पावती फाडण्यावरून वाद करून फिर्यादीसह त्यांचा सहकारी विष्णू गव्हाणे याला लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राठोड करीत आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close