shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन उद्या शिर्डीत..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                        बुधवार दिनांक १५ जून २०२२

देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन उद्या शिर्डीत..!!


शिर्डी : भारत गौरव योजनेंतर्गत  देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन  उद्या गुरुवारी शिर्डीत  दाखल होत आहे. या ट्रेनला मंगळवारी कोईम्बतूर  येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वेसेवेअंतर्गत खासगी ट्रेन  प्रथमच धावली.
रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी कराराने दिली आहे. ही ट्रेन चालविणार्‍या कंपनीने कोचमध्ये नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप  होणार आहेत. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत.

या ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल. ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था  करण्यात आली आहे. रेल्वे पोलिस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी असतील.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close