shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रा सरकारने व राज्य महिला आयोगाने केलेल्या "अनिष्ठ विधवा प्रथा बंद " च्या अहवानाला इंदापूर मध्ये प्रतिसाद.

महाराष्ट्रा सरकारने व राज्य महिला आयोगाने केलेल्या "अनिष्ठ  विधवा प्रथा बंद " च्या अहवानाला इंदापूर मध्ये प्रतिसाद.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी  इंदापूर मध्ये प्रथम स्वतः पासून केली सुरुवात.
इंदापूर प्रतिनिधी:चला विधवा प्रथा हद्दपार करू या, स्त्री सन्मानाचे साक्षीदार होऊ यात! या पुरोगामी युगात महाराष्ट्रा सरकारने व राज्य महिला आयोगाने केलेल्या "अनिष्ठ  विधवा प्रथा बंद " च्या अहवानाला प्रतिसाद देत इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी  इंदापूर मध्ये प्रथम स्वतः पासून सुरुवात केली आहे. या मध्ये पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोरणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे या अगित प्रथा पूर्णता बंद करण्याचा निर्धार पूर्वक इंदापूर तालुका अध्यक्षा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३वा वर्धापनदिन याचे अवचित्त साधुन हा निर्णय घेण्यात आला, या निर्णयानुसार समाजातील व कुटूंबातील महिलांच्या बाबतीत एक पुरोगामी  निर्णय घेण्याचा संकल्प करून मार्गदर्शन केले, यावेळी हा निर्णय इंदापूर तालुक्यातील सर्व महिला पुरुष यांच्यापर्यंत पोहचवण्याबाबत निर्णय केला आहे. 
यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
close