किशोरी खटके हिचे बारावीच्या परीक्षेत यश
इंदापूर प्रतिनिधी:तरटगाव ता.इंदापूर येथील किसनराव भानुदास भांगे यांची नात किशोरी विकास खटके-पाटील रा तांबवे टेम्भूर्णी हीने बारावी विज्ञान शाखेत ९०.५० टक्के गुण मिळवून आर्या पब्लिक स्कूल, पिंपळनेरमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल तिचे भारतीय जनता पक्षाच्या द्विव्यांग आघाडीचे तालुका उपाध्यक्ष किसनराव भांगे, तात्यासाहेब रामदास कोरटकर, उद्योजक अतुल सरडे,प्रा.दादासाहेब भांगे,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रा. राम आसबे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचं असून, ग्रामीण भागात सेवा देण्याची इच्छा आहे. बारावीच्या निकालानंतर किशोरीची नीट परीक्षेची तयारी सुरू आहे. ती आपल्या यशाचे श्रेय वडील विकास खटके-पाटील,आई प्रविणी खटके-पाटील व शिक्षकांना देते. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

