shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त इंदापूर येथे जनजागरण रॅली.

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त इंदापूर येथे  जनजागरण रॅली.
 
इंदापूर प्रतिनिधी: करे योग रहे निरोग या वाक्या नुसार योगाचे महत्त्व हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे म्हणूनच
इंदापूर येथे पतंजली योग परिवार व युवा भारत इंदापूर यांच्या वतीने २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त उत्सवाला सुरुवात केली आहे. आय कॉलेजपासून जनजागरण रॅली काढली या रॅलीची सुरुवात नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांनी केली तर माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे सर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत केली.
यावेळी पतंजली योग समितीच्या इंदापूर अध्यक्षा सायरा आत्तार व सर्व योग शिक्षक, युवा क्रांती प्रतिष्ठान चे  सदस्य, जय इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी व इतर यांनी ही रॅली बाजारतळ मार्गे चाळीस फूटी रोड , दर्गा मस्जीद चौक, बागवान गल्ली , नेहरू चौक , मेन रोड , कांबळे गल्ली , हायवे मार्गाने मुलींची शाळा येथे वंदे मातरमने समाप्त झाली .
close