shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गैरसमज पसरवून स्वार्थ साधणार्‍या पासून इंदापूर तालुक्यातील जनतेने दूर राहावे - हर्षवर्धन पाटील.

गैरसमज पसरवून स्वार्थ साधणार्‍या पासून इंदापूर तालुक्यातील जनतेने दूर राहावे - हर्षवर्धन पाटील.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन समाजकारण राजकारण केले. हा तालुका सगळ्या जाती धर्म बरोबर घेऊन जाणार्‍या बरोबर राहिला आहे .समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व गैरसमज पसरून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काही मंडळी प्रयत्न करत आहेत. या पासून समाजाने सावध राहण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निमसाखर येथील कार्यक्रमाप्रसंगी केले. 
निमसाखर  येथे बुधवार दिनांक १५ व गुरुवार दिनांक १६ रोजी हजरत खाजा बंदे नवाज निमसाखर (ता. इंदापूर) आठव्या उरुसाचे आयोजन करण्यात आले होते . दरम्यान आयुब शेख यांच्या प्रयत्नातून या दर्ग्याचे काम झाले आहे .
यावेळी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हजरत ख्वाजा बंदेनवाज दर्ग्याला फुलांची चादर चढवण्यात आली. या निमित्ताने प्रसिद्ध कवाली कार हसिम नाझा यांचा कवाली चा कार्यक्रम झाला.

 पुढे बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजास गेली चार पिढ्यासह आपण एकत्र आहोत. काही राजकीय निर्णय घेत असताना इंदापूर तालुक्यात कायमच जातीय सलोखा राखला आहे. महाराष्ट्रामध्ये ११२ सहकारी साखर कारखाने असून या साखर कारखान्यांमध्ये दोन ते तीन महिला संचालिका असतात मात्र मुस्लीम समाजाला संधी देणारा एकमेव महाराष्ट्रातील निरा भीमा साखर कारखाना असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक भागवत गोरे, माजी संचालक रणजित रणवरे, बाबुराव रणवरे ,अनिल बोंद्रे, नानासाहेब चव्हाण, युवराज रणमोडे, गोविंद रणवरे ,सुनील रणवरे ,राहुल दुबे ,तुळशीदास महारनवर, गजानन सातपुते, लालासाहेब चव्हाण, मुख्तार मुलानी ,बबलू पठाण, दादाभाई मुलानी, जाकिर मुलानी, अतुल सेख,खबूद्दीन मुलानी, जाफर भाई शेख गुरुजी, रशीद मुलानी, मुबारक मुलानी ,दिलावर पिंजारी, गुलाब डांगे, वजीर मुलानी, रशीद शेख ,मिराज मुलानी, दत्तात्रय चौधरी, नवनाथ रणवरे ,शांताराम रणवरे, शिवराज रणवरे इत्यादी उपस्थित होते
close