श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे- मागणी
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात दररोजच अनेक महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होत आहेत,याचा मध्यस्थांसह वाहन चालक/ मालकांना मोठा मनस्ताप सहन करणे भाग पडत आहे, कोणत्याही सरकारी कार्यालयात जर कागदपत्रे जमा केली तर त्याचा योग्यरितीने संभाळ आणि जतवणूक करणे हे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कर्तव्यच असते,जो पर्यंत संबंधितांची कामे होत नाहीत तोपर्यंत सदरील कागदपत्रे ही शासकीय कार्यालयातच जमा केलेली असतात,मात्र जर कामानिमित्त शासकीय कार्यालयात जमा केलेली कागदपत्रे गहाळ होत असेल आणि संबंधित अधिकारी कर्मचारी हे सदरील बाबी आमची जबाबदारी नाही असे म्हणत असेलतर मग जनसामान्यांनी दाद मागायची ती कोणाकडे ? असा गंभीर आणि भयानक प्रकार सध्या श्रीरामपूरच्या उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात चालु असल्याचे बघावयास मिळत आहे.
कारण येथील प्रशस्त आणि अद्यावत अशा भव्य कार्यालयासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी फर्निचरद्वारे स्वतंत्र कॅबीन बनविले आहे, त्यांच्या कॅबीनमध्ये इतर कोणाचाही प्रवेश होऊ नये यासाठी प्रत्येक कॅबीनला स्वतंत्र दरवाजे बसविले आहे,कॅबीनच्या बाहेरील बाजूस कागदपत्रे स्विकारण्यासाठी जाळीदार आणि काचेच्या खिडक्या बसविण्यात आलेल्या आहेत,महत्वाच्या कागदपत्रांची व्यवस्थिरित्या ठेवण व्हावी यासाठी सर्वोतोपरी सुसज्ज असे याठिकाणी कार्यालय आहे, मग इतके बंदिस्त आणि सुसज्ज कार्यालय असताना य कार्यालयात वाहन चालक/ मालकांनी जमा केलेली महत्वाची कागदपत्रे गहाळ होणे अथवा न सापडणे किंवा चोरी जाणे ? ही केवळ गंभीर समस्याच नसून मोठी लाजिरवाणी बाब आहे.
सातत्याने घडणाऱ्या अशा या गैरप्रकाराकडे मग वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे का ?, किंवा संबंधित काही खादाड कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितापोटी कागदपत्र गहाळ केली जातात का ?, की अन्य इतर कोणी बाहेरील व्यक्ती सातत्याने जाणिवपूर्वक सदरील कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे चोरुन नेत आहे का ?, यासर्व बाबींचा योग्य तपास करुन या गैरप्रकारांना आळा घालणे हे कार्यालयीन प्रमुख या नात्याने वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याचे केवळ कामच नव्हेतर ड्यूटी (सेवा) कर्तव्यच असते,मग का बरे वरिष्ठ अधिकारी देखील या गैरप्रकारांबद्दल दुर्लक्ष करीत असणार ?, हा प्रश्न देखील तीतकाच महत्वाचा आहे.
पुर्वी याठिकाणी कार्यरत तात्कालीन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक अहमद खान यांच्या सेवानिवृत्तीनंतर नानासाहेब बच्छाव नामक उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने या कार्यालयाचा पदभार स्विकारला होता,मात्र सेवानिवृत्तच्या उंबरठ्यावर असताना नको रिस्क घ्यायला अशा विचाराने पछाडलेली तात्कालिन वरिष्ठ अधिकारी मंडळी महीना- पंधरा दिवसांनी आपल्या कार्यालयात फेरफटका मारत असे, त्यांच्या अशा या दुर्लक्षपणामुळेच येथील आरटीओ कार्यालयात बेशिस्तपणाचा अक्षरशः कळस गाठला आहे.
म्हणून केवळ सेवानिवृत्त होणारे अधिकारीच जर याठिकाणी येऊन सेवानिवृत्त होत असतील तर नको थोड्या दिवसांसाठी कटकट आणि झंझट म्हणून ते सक्षमपणाने आपले कार्य व्यवस्थितरीत्या पार पाडत नाही असे येथील काही मध्यस्थ आणि वाहन चालक,मालक आवर्जून सांगतात,आता नानासाहेब बच्छाव सेवानिवृत्त झाल्याने अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार मॅडम येथील कार्यालयाचा तात्पूर्ता कार्यभार सांभाळला आहेत,मात्र अहमदनगर आणि श्रीरामपूर अशा दोन्ही कार्यालयाचा कार्यभार संभाळताना त्यांचीही ससे होलपट जरी होत असली तरी, किमान जो पर्यंत त्यांच्याकडे श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचा तात्पूर्ता अतिरिक्त प्रभारी कार्यभार आहे, तोपर्यंत त्यांनी त्यांच्या अहमदनगर आरटीओ कार्यालयाप्रमाणेच श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देखील योग्य समज देऊन योग्य शिस्तीचे पायंडे पाडावे आणि श्रीरामपूर चे आरटीओ कार्यालय देखील अहमदनगर आरटीओ कार्यालयाप्रमाणेच आदर्शवत घडावे,तसेच शासनाने श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास केवळ येथे येऊन सेवानिवृत्त होणारे अधिकारी न पाठवता सक्षम आणि योग्य निर्णायक भुमिका घेणारे खमके अधिकारी पाठवावेत अशी येथील वाहन चालक/ मालक आणी जनसामान्यांतून देखील मागणी होत आहे.

