shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना ही खुशबूने यश संपादन केले !

◼️ चंद्रपूर-  किरण घाटे -◼️ 
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना निव्वळ अभ्यासाच्या भरोश्यावर  चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी येथील खुशबू कामडी या विद्यार्थिनींने नुकत्याच जाहीर झालेल्या दहाविच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.ती येथील स्थानिक  सरस्वती कन्या विद्यालयाची नियमित विद्यार्थिनी असुन तिने या परीक्षेत ९१:४०टक्के गुण प्राप्त केले आहे.  नेरी येथील तिन्ही विद्यालयातुन खुशबू पेक्षा काही  विद्यार्थ्यांना अधिक गुण आहे . परंतु खुशबूच्या घरच्या परिस्थितीचा विचार करता तिने मिळविले यश हे खरोखरच अभिनंदनीय असेच आहे.     



◼️खुशबू ही मोलमजुरी करणा-या नरेंद्र कामडी यांची कन्या असुन तिची जन्मदाती आई तीन वर्षां पुर्वि कामडी कुटुंबाला सोडुन घरुन निघुन गेली . खुशबुवर अल्पवयातच  वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच एका कुटुंबातील मुख्य स्रिची भुमिका पार पाडावी लागली .तीन भावंड व वडील यांचे सर्व घरकाम सांभाळून तिने मॅट्रीक पर्यंत आपले शिक्षण पुर्ण केले . कुटुंबात एकमेव पुरुष ( वडील ) रोजीरोटी करणारा !  कुठलंही आर्थिक पाठबळ नाही. ग्रामिण भागातील शिक्षण संस्था स्वता:च विद्यार्थ्यांचे मॅट्रीक पर्यंतचा शिक्षण खर्च उचलतात. त्यामुळेच सर्व शिक्षण तिचे  मोफतच झाले. पण आता  मॅट्रीक नंतरच्या शिक्षणाचं काय ? हाच यक्ष प्रश्न आर्थिक परिस्थिती बरी नसलेल्या खुशबू  समोर उभा  ठाकला आहे. तिला मनापासून शिक्षणाची आवड व गोडी आहे . तिला  भरपुर शिकायचं आहे . तिच्या मध्ये आज ही  जिद्द व चिकाटी कायम आहे. परंतु पारिवारिक समस्या अत्यंत गंभीर आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर आजच्या घडीला स़पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. अश्यातच या मुलीच्या  शिक्षणाचा पुढील प्रश्न ऐरणीवर आहे.


◼️खुशबूने अत्यंत  कठीण परिस्थितीतुन जे दहावीच्या परीक्षेत यश मिळविले ते खरोखरंच कौतुकास्पद आहे.

◼️आपले काका नितिन कामडी व काकू निवेदिता कामडी यांनी वेळोवेळी शिक्षणासाठी मला मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळेचं या परीक्षेत मी हे घवघवीत यश संपादन केले अशी खूशबू आज या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरून  बोलताना म्हणाली . विशेष उल्लेखनिय बाब अशी की खूशबू ज्या शाळेत शिकते त्या शाळेचा निकाल या वर्षी १००टक्के लागला असल्याचे नेरीचे संजय डोंगरे यांनी सांगितले.दरम्यान नेरी येथील प्रतिष्ठीत व्यापारी सुरेश कामडी यांचेसह सरस्वती कन्या विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्गांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणा-या या खूशबूचे अभिनंदन केले आहे.
close