shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बल्हाणे गावाची वि. का. सोसायटी तिसऱ्यांदा बिनविरोध..!


धुळे जिल्हय़ातील साक्री तालुक्यातील बल्हाणे गावाची वि का सोसायटी तिसऱ्यांदा बिनविरोध भाजपा नेते मा आबासाहेब विलासराव बिरारिस यांची सत्ता कायम..!

धुळे प्रतिनिधी ।  दिलीप घरटे :- तालुक्यातील अतिशय महत्वाची समजली जाणारी बल्हाणे विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले  आहे.यासाठी विलासराव बिरारीस यांचे प्रयत्न यशस्वी ठरलेत.यात सर्व घटकाना न्याय देत ग्रामस्थांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आली.  सलग तिस-यांदा बिनविरोध करण्याची परंपरा कायम राहिली.

विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुकीत  बिनविरोध निवडून आलेले संचालक असे की, सर्वसाधारण मतदार संघातून विलासराव आत्माराम बिरारीस,उमाकांत लक्ष्मण बिरारीस, खंडेराव सोनवणे,शांताराम बिरारीस ,भास्करराव बिरारीस, सुरेश अहिरराव,विलास कुवर , वसंतराव दाभाडे तर ओबीसी मतदार संघातून भाऊसाहेब अहिरराव हे बिनविरोध निवडून आले.
स्री राखीव मतदार संघात सौ.मालतीबाई भिकनराव बिरारीस,सौ.ज्योतीबाई सुरेश साळुंके(पाटील),भटक्या विमुक्त प्रवर्ग संघातून दिलीप धर्मा बुवा,अनु.जाती जमाती प्रवर्ग संघातून राजेंद्र भटु खैरनार हे बिनविरोध निवडून आले.

बिनविरोध झालेल्या संचालकांचे सोसायटीच्या सर्व सभासदांनी व बल्हाणे ग्रामस्थांनी कौतुक व स्वागत केले. 

जिल्हयाचे जेष्ठ नेते जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, युवानेते जि.प.सदस्य  हर्षवर्धन दहिते व बल्हाणे गावाचे गटनेते,माजी जि.प.सदस्य तथा शेतकी संघाचे चेअरमन  विलासराव बिरारीस यांच्या मार्गदर्शनाने व सहमतीने बल्हाणे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याची तीन पंचवार्षिक पासूनची ही परंपरा कायम राखली आहे.यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व जमातीच्या लोकांनी एकत्र विचारविनिमय करून संचालक पदासाठी एकेक उमेदवार देत सहकार्य केले.
close