चिमूर (चंद्रपूर)▪️किरण घाटे▪️आज पासून चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शाळा आरंभ झाल्या असून काही शाळेतील विद्यार्थी वर्गांची उपस्थिती उल्लेखनिय अशीच होती.
दरम्यान चिमूर शहरातील नामांकित नेहरू विद्यालय व ज्युनिअर महाविद्यालय ही सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी प्राचार्य विलास वडस्कर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले.
या वेळी किशोर गोठे ,निशिकांत मेहरकुरे,जयंत गौरकर , मुरलीधर कामडी व अन्य शिक्षक उपस्थित होते.

