shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रपूर जिल्ह्यात झोलाछाप डॉक्टरांवर कारवाई !

◼️प्रा. डॉ. अजय पिसेंनी केली होती तक्रार 
◼️जिल्हा प्रशासनाने घेतली दखल!
 
चंद्रपूर-▪️किरण घाटे जि.प्र.
चिमूर परिसरातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टर गावोगावी रूग्णांवर ब-याच दिवसांपासून उपचार करीत आहेत. त्यांच्या उपचारांमुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबतीत अनेकदा तक्रारी झाल्या होत्या. परंतु त्यांचेवर आज पावेतो कारवाई झाली नव्हती.अश्या या झोलाछाप डॉक्टरांच्या अर्धवट ज्ञानामुळे अनेक जण दगावले परंतु त्याची नोंद घेतल्या गेली नाही. 



कोरोना काळात कोणतीही डिग्री नसतांना अनेकांनी आपले रुग्णालये थाटले असल्याचे बोलल्या जाते. या झोलाछाप   डॉक्टरांची दखल आम आदमी पार्टी तर्फे घेण्यात आली व तसा आवाजही उठविला गेला. प्रशासनाला याची माहिती असूनही ते  दुर्लक्ष करीत होते. लोकप्रतिनिधी देखिल या विषयी पूर्णता उदासीन होते . सदरहू डॉक्टरांमुळे ग्रामीण भागातील हजारों लोकांचे आयुष्य धोक्यात आले होते.

   


चिमूर आम आदमी पार्टीचे  विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच चिमूर चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नागभीड यांना ई-मेल द्वारे झोलाछाप डॉक्टरांची तक्रार नोंदवली होती.  वातावरणातील  बदलामुळे चिमूर व नागभीड तालुक्यातील सर्वच भागा़मध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावित आहेत. बहुतांशी भाग हा ग्रामीण असल्यामुळे व जनतेमध्ये आरोग्याबद्दल पाहिजे तितकी जागरूकता झाली नसल्यामुळे गावोगावी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. हे तेव्हढेच सत्य आहे.  कोणतीही वैध पदवी नसतांना अनेक बोगस डॉक्टर लोकांना औषधे, इंजेक्शन, सलाईन देतांना आढळतात. सध्या अश्या डॉक्टरांवर चंद्रपूर जिल्ह्यात कारवाई होत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
close