चंद्रपूर (बल्लारपूर)◼️किरण घाटे जि.प्र.◼️
बल्लारशाह किल्ल्याच्या व बल्लाळशाह राजे यांच्या समाधी स्थळाचे संरक्षण,पुनर्वसन आणि सौदर्यांकरणा साठी काल इमेल व्दारे पराग गुंडेवार यांनी बल्हारपूर नगरपरिषदेला एक निवेदन दिले आहे .पराग गुंडेवार म्हणतात की न.प.च्या नव्या मुख्याधिका-यांची अद्याप भेट झाली नाही सदरहु निवेदन भेट घेऊनच मी देणार होतो .मात्र ते बल्लारपूरात उपस्थित मिळाले नाही.दरम्यान सदरहु निवेदन त्यांनी त्यांना इमेल व्दारे पाठवीले असल्याचे समजते .
◼️पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पहिली राजधानी शिरपुर तर दक्षीण गोंडवानाची दुसरी राजधानी ही बल्लारशाह शहरात आहे.विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्लाळशाह राजे यांचा राजधानीचा किल्ला असलेल्या बल्लारशाह किल्ल्याचा मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात बुरुज ढासळला होता.
यात ऐतिहासीक किल्ल्या सह शेजारच्या घराचे ही अतोनात नुकसान झाले होते .सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची प्राणहानी झाली नव्हती . पुरातन विभागाकडे या किल्ल्याची व विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्लाळशाह राजे यांच्या समाधी स्थळाची अद्याप नोंद नसल्याचे एकंदरीत दिसून येते.
◼️पुरातन विभागाने दिलेल्या माहिती अधिकारात हे स्पष्ट झाले आहे . किल्ल्याची व समाधी स्थळाची जबाबदारी ही नगर परिषद बल्लारपूरची आहे.बल्लारशाह नगर परिषदे ला २कोटींचा निधी येऊन ही सदरहु किल्ल्याचे विषेश काम अद्याप त्यांनी केले नाही .
◼️किल्ल्याचा बुरुजाला संरक्षन भिंत बांधली नाही किंवा किल्लाच्या पुनर्वसनासाठी तदवतचं सौदर्यांकरणा करिता योग्य ती पाऊले उचलल्या गेली नाही. वर्ष निघुन गेले परत पावसाळ्याला सुरुवात झाली आहे .
तरीही स्थानिक प्रशासना कडुन योग्य त्या उपाय योजना होतांना दिसून येत नाही. किल्ल्याची व समाधी स्थळाची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालेली आहे.
बल्लारपूर शहराला ऐतिहासीक वारसा लाभला आहे, तो वारसा कायम ठेवण्यासाठी प्रशासन या बाबतीत मात्र काही करतांना दिसत नाही. ही एक शोकांतिकाच आहे.
या पावसाळ्यात किल्ला व समाधी स्थळाचे काही नुकसान झाले तर त्याला सर्वस्व जबाबदार स्थानिक प्रशासन व बल्लारपूर विधानसभेचे विद्यमान आमदार असतील असे निवेदनात पराग गुंडेवार यांनी शेवटी नमुद केले आहे.

