shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायपूर छत्तीसगड येथे 13 सप्टेंबरला होणार आदिवासी अधिकार दिवस कार्यक्रम !

चंद्रपूर-▪️किरण घाटे-▪️

येत्या 12 व 13 सप्टेंबरला छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरयेथे आदिवासी अधिकार दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील दोन लाखांच्या आसपास सर्व आदिवासी जमाती सहभागी होणार असुन त्या निमित्ताने नियोजन सभा नुकतीच संपन्न झाली. दि.13 सप्टेंबर रोजी अंतरराष्ट्रीय आदिवासींचे  अधिकार  युनायटेड नेशन्स मध्ये 46 आर्टिकल्सची घोषणा करण्यात आली होती.आदिवासींचे संविधानातील अधिकार स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षित ठेवण्यासाठी एक बुलंद आवाज होण्यासाठी प्रयत्न होत आहे.





या नियोजन सभेत  अमरजीत भगत खाद्य ,नागरिक आपूर्ती, उपभोक्ता संरक्षण, योजना आर्थिक, सांख्यिकी व सांस्कृतिक मंत्री अरविंद नेताम  माजी केंद्रीय मंत्री,  नंदकुमार सहाय माजी मंत्री माजी अनु जमाती आयोगाचे अध्यक्ष अशोकभाई चौधरी महासचिव आदिवासी एकता परिषद अँड. निकोलस बारेला आदिवासी समन्वय मंच भारत, कुसुम ताई अलाम लेखिका आदिवासी सेवक सामाजिक कार्यकर्ता, नक्ताराम  रावते  उत्पल चौधरी, डॉ. सुनिल पराड,व भिल्ल, हलबा, गोंड, वारली, कंवर आदिवासी समुदायाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

close