चंद्रपूर -किरण घाटे
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरू कुंज आश्रम व्दारा संचालीत श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ शिवाजी नगर यांच्या वतीने चंद्रपूर नगरीतील शिवसाई सभागृह गोपाल नगर येथे सोमवार दि.१८जूलैला दुपारी १ वाजता गुरू पुजन सोहळा आयोजित केला आहे.या ठिकाणी पंढरपूर वारीतील वारकरी, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, १०व १२तील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे.
सदरहु कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुभाष कासनगोटुटवार, विजय चिताडे, आण्याजी ढवस, मंजुश्री कासनगोटुटवार, उषाताई मेश्राम आदीं उपस्थित राहणार आहेत.
सर्व भाविक भक्तांनी न चुकता या आयोजित सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन कल्पना गिरडकर यांनी आज केले आहे.


