▪️पटवा-यांनी केले ९०टक्के पंचनामे सादर !
चंद्रपूर ▪️ किरण घाटे ▪️
![]() |
| तहसीलदार संजय राईंचवार बल्हारपूर |
बल्हारपूर तालुक्यात ब-याच वर्षाच्या कालावधीनंतर वर्धा व इरई नदीला पुर आला .सतत या भागात पाच ते सहा दिवस पाऊस पडला .दरम्यान अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील ११५घरांचे अशंता नुकसान झाले व त्या पैकी नव्वद टक्के पंचनामे पटवा-यांनी मौक्का चौकशी करून तहसील कार्यालयात सादर केले.
झालेल्या पावसामुळे कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी किंवा जनावरे मृत्युमुखी पडले नसल्याचे बल्हारपूर तालुक्याचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी आज या प्रतिनिधीला संध्याकाळी भ्रमनध्वनीवरून बोलताना सांगितले.शेत जमीन पीक नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू असुन ते अद्याप पूर्ण झाले नसल्याचे ते म्हणाले.या तालुक्यात एकूण ३५गावांचा समावेश असून बल्हारपूर तालुक्यात आता पावेतो ६८७मी.मी.पाऊस पडला .


.jpeg)
.jpeg)

