shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

पुणे: दि. १४ / राज्यातील पावसाचं प्रमाण वाढत आहे. अशातच अनेक धबधब्यांना निसर्गरम्य, मनोहर रूप प्राप्त झालं आहे.
 समुद्रकिनारी पर्यटक गर्दी करत आहेत. 
मात्र अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.कुठे दरड कोसळ तर कुठे झाडं पडल्याचं पाहायला मिळालंय. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे आणि परिसरात पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 
यामुळे एक खबरदारी म्हणून पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.

हवेली, मावळ ,मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर आणि आंबेगाव याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी याठीकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. वेगाने वाहणाऱ्या पावसात उतरणं त्यात पोहणं. 
धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणं. यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या गोष्टीचं पालन न केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
close