shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंदन करतो गुरूंना!

वंदन करतो गुरूंना!

जमीन सुपीक असेल तर,
काही न काही पिकायचे!
सहवासातून प्रत्येकाच्या,
काही न काही शिकायचे!!

अनुभव जसा मिळेल तसा,
प्रवास असतो सुरू!
ज्याच्याकडून शिकलो तो तो,
नकळत असतो गुरू!!

परंतु तेच विशेष ज्यांनी,
शब्द छडीने बडवले!
कानात फुंकर मारून अनमोल,
मंत्र देवून घडवले!!

प्रणाम करतो जीवनातल्या,
त्या विशेष वाटसररुंना!
गुरू पौर्णिमा निमित्त वंदन,
करतो प्रिय गुरूंना!!
    राजेंद्र नारायणे
श्रीरामपूर जिल्हा अ.नगर
     (9850608131)
close