शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. सोमवार दिनांक ११ जुलै २०२२
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी घटनाः संगमनेर येथील 25 वर्षाच्या योगेश डोंगरे युवकाचे अवयव रात्री पुणे, नाशिक येथे रवाना, या अवयामुळे चार रूग्णांचे जीव वाचणार..!!
अहमदनगर (संगमनेर) : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर या गावातील डोंगरे परिवारातील योगेश डोंगरे या तरुणाचा अपघात झाला आणि या अपघातात त्याचे ब्रेन डेड झाले होते हे सर्व त्यांच्या कुटुंबाला माहित झाले आणि त्यांनी निश्चय केला की आपल्या मुलाचे अवयव दान करायचे आणि अवयव दुसऱ्या कोणत्यातरी रुग्णाचे जीव वाचवतील अशी प्रथमच कल्पना त्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी केली.
लगेच खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये डोंगरे या पेशंटला आणले व पुढचे सूत्र हलवले त्या युवकाचे लिव्हर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल ला नेण्यात आले तर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये एक किडनी व दुसरी किडनी नाशिक येतील अपोलो हॉस्पिटल येथे देण्यात येणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.
खासदार डॉक्टर सुजय विखे म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील प्रथमच हि घटना आहे की जिवंत लिव्हर आणि दोन किडन्या अहमदनगर जिल्ह्यातून पुणे आणि नाशिक येथे प्रवास करणार आहेत यासाठी पोलिस प्रशासन तसेच तज्ञ डॉक्टर टीम रवाना करण्यात आली आहे आषाढी एकादशी निमित्त एक पुण्याचे काम डोंगरे कुटुंबाने चार कुटुंबाचे जीव वाचवण्याचे काम केले आहे त्यामुळे स्वतःच्या मुलाचे अवयव दान केल्यामुळे त्यांना पुण्यदान लाभणार आहे मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो तसेच सर्व समाजातील नागरिकांनी या कुटुंबाचा आदर्श घ्यावा असेही खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी योगेश डोंगरे यांच्या अंत्यविधीला स्वतः खासदार सुजय दादा विखे पाटील व सर्व शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते तसेच अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व अवयवदान प्रक्रियेमध्ये तज्ञ डॉक्टर टीम पुणे येथील प्रत्यारोपण सर्जन डॉक्टर बिपिन विभुते यांच्यासमवेत डॉक्टर मनीष प्रसाद पाठक (भूलतज्ञ), डॉक्टर संदीप नळे (भूलतज्ञ), डॉक्टर राहुल मांडे (भूलतज्ञ), डॉक्टर आनंद काशीद (यूरोलॉजिस्ट), डॉक्टर हर्षवर्धन तनवार (यूरोलॉजिस्ट), डॉक्टर साईप्रसाद शिंदे (नेफरोलॉजिस्ट), तसेच डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल चे उपसंचालक डॉक्टर अभिजीत दिवटे, डॉक्टर सुनील म्हस्के, सतीश मोरे, डॉक्टर अभिजीत मेरेकर, प्रसाद काजळे, सागर काकड, मनोज आव्हाड हे सर्व डॉक्टरांचे या अवदान प्रक्रियेमध्ये सहकार्य लाभले आहे.
.......................
श्रध्दांजली वाहतांना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, योगेशवर अनेक महिन्यांपासुन उपचार सुरु होते. परंतू एवढ्या मोठ्या प्रयत्नांनंतरही योगेशचे प्राण वाचवू शकले नाहीत. यासर्व दु:खावर मात करुन, ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटूंबातील असलेल्या डोंगरे परिवाराने त्याचे अवयव दान करण्याचा घेतलेला निर्णय हा खुप महत्वपूर्ण आहे. अवयव दानाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले जाते परंतू जिथे सुशिक्षीत माणसं पुढे येत नाहीत तिथे डोंगरे परिवारासारख्या ग्रामीण भागातील कुटूंबाने पुढे येवून केलेला निर्णय संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. यासाठी ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी घेतलेला पुढाकारही माझ्या दृष्टीने खुप महत्वाचा असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
योगेश डोंगरे ह्या तरुणाने ऍग्री डिप्लोमाचे शिक्षण डोळासने येथुन घेतले असल्याने योगेशला शेती मध्ये रस होता. आई-वडिलांना शेतीच्या कामा मध्ये तो नेहमी मदत करत होता. काही दिवसांपूर्वी योगेशचा आळेफाटा येथे अपघात झाला. त्याला प्रवरा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. परंतु अधिक मार लागल्याने त्याचा ब्रेनडेड झाला. सर्वांच्या मदतीला धावणारा तरुण पठार भागाने गमावल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. योगेशचे गावातील प्रत्येक कार्यास योगदान असायचे. प्रत्येकाला मदतीचा हात द्यायचा. त्यामुळे, कर्णासारख्या दनशूर तरुणाला पठारभागाने गमावले आहे
- जनार्दन पा. आहेर* (शिवसेना तालुका प्रमुख)
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

