आळंदी : येथील प्रसिध्द तबलावादक शामजी गोराणे व प्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे यांचे चिरंजीव कु. सोहम गोराणे यांना तबला या विषयामध्ये गुरुकूल प्रतिष्ठान आयोजित पद्मविभूषण पं. हरिप्रसादजी चौरासिया शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
गुरुकूल प्रतिष्ठान, ठाणे या संगीतात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे कलासाधक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणुन शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षीही कलेची उंच भरारी घेणाऱ्या १३ कलासाधक विद्यार्थ्यांना जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसादजी चौरासिया यांच्या नावाने दिली जाणारी शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. ही शिष्यवृत्ती पद्मविभूषण पं. हरिप्रसादजी चौरासिया यांच्या हस्ते दिनांक १७ जुलै रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे देण्यात येणार असल्याचे जगप्रसिद्ध बासरीवादक विवेकजी सोनार यांनी जाहीर केले आहे...
कु. सोहम गोराणे यांचे तबलावादनाचे शिक्षण जगविख्यात तबलावादक पं. योगेशजी समसी यांचेकडे चालू आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी सोहमने झी मराठी चॅनलवरील रियालिटी शो, 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमात १६ प्रकारची तालवाद्ये वाजवून सर्वांना अचंबित केले. आज त्यांची जगभर ख्याती आहे. सोहमने आजपर्यंत अनेक जगप्रसिद्ध कलाकारांसोबत तबलासाथसंगत तसेच जुगलबंदी केली आहे. त्यामध्ये जगविख्यात गायक संगीतकार पं. सुरेशजी वाडकर गुरुजी, पं. शंकरजी महादेवन, टोनी कक्करजी, दलजित दोसांजजी हे होत.
सोहमला आजपर्यंत ५०० हुन अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. जगविख्यात गायक पं. सुरेशजी वाडकर यांच्या आजीवासन गुरुकूलची शिष्यवृत्तीही सोहमला मिळाली आहे. ही शिष्यवृत्ती जगविख्यात गायक उस्ताद रशीद खाँसाहेब यांचे हस्ते तसेच पं. बिरजु महाराजजी, उस्ताद झाकीर हुसैनजी, जगप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनजी, तारक मेहता का उलटा चष्मा सिरीयल मधील तारक मेहता म्हणजेच शैलेशजी लोढा, प्रसिध्द गझल गायक हरीहरनजी, पंकज उधासजी, अनुप जलोटाजी, जावेद अलीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
गुरुकूल प्रतिष्ठानची पद्मविभूषण पं. हरिप्रसादजी चौरासिया शिष्यवृत्ती तबला क्षेत्रामध्ये कुमार सोहम गोराणे यांना मिळणे हा सोहमच्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान आहे, अशी प्रतिक्रीया प्रसिध्द तबलावादक सोहमचे वडील शामजी गोराणे यांनी व्यक्त केली.
0000

