विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर च्या (PTA)पालक शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदी पालक प्रतिनिधी वर्गातून नानासाहेब खरात यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी:पालक शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदी शिक्षकातून शाळेच्या प्राचार्य ज्योती जगताप यांची निवड झाली, तर पालक प्रतिनिधी वर्गातून नानासाहेब खरात यांची निवड झाली, तसेच सेक्रेटरी म्हणून इनामदार मॅडम व निमगाव केतकीचे हर्षवर्धन पाटील यांची निवड झाली, सचिव म्हणून ननवरे मॅडम व डॉक्टर सारंगी कुंभार तसेच ऑडिटर म्हणून अमोल राऊत यांची निवड झाली,
यावेळी नानासाहेब खरात म्हणाले की,विद्या प्रतिष्ठान ही अतिशय मोठी व उत्कृष्ट संस्था असून या संस्थेत मला प्रतिनिधित्व करण्यास मिळाले, ही माझ्यासाठी चांगली संधी असून यापुढे पालक, शिक्षक, व विद्यार्थी, तसेच सर्व वर्गाचे प्रतिनिधी व संघटनेची नवीन कार्यकारणी यांना बरोबर घेऊन पालक, विद्यार्थी, व शिक्षक,यांच्या जास्तीत जास्त अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन, तसेच शाळेत विद्यार्थ्यांच्या उपयोगात येणारे नवीन उपक्रम राबवू. यावेळेस प्रतिनिधी शिक्षक स्टाप व नवीन कार्यकारणी उपस्थित होती, निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून नानासाहेब खरात यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती,पांडूरंगतात्या मारकड,यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

