प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा : दि. २७/ करमाळा तालुक्यातील वांगी नं 3 येथे तीन चोरट्यानी दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून स्वयंपाक खोलीतील कपाटामध्ये ठेवलेल्या दागिन्याची चोरी केली आहे.
दोन लाख एक्कोनतीस हजार पाचशे रुपयांच्या दागिन्याची चोरी झाली असुन याबाबत धनंजय किसन तळेकर रा.वांगी नं. 3 यांनी फिर्याद दिली असुन पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये सोन्याचे दागिणे व रोख रक्कम हे लबाडीने चोरून नेलेले आहेत.
याबाबतीत भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन एका आरोपिला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे पुढील तपास स.पो.नि. जगताप हे करीत आहे.

