शिर्डी:-भारतातील ऐतिहासिक अशी गोष्ट पहिल्यांदाच घडल्याने आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर निवड झाल्याने शिर्डी शहरात विर एकलव्य प्रतिष्ठाण व भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर यांनी लाडु वाटप करुन व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला . राष्ट्रपती पदांची संधी आदिवासी समाजाला मिळाल्याने पंतप्रधान व भारतीय जनता पक्ष व घटक पक्षांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डी नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे ,मा.नगरसेवक किरण बर्डे मंगेश त्रिभुवन, राजेंद्र भाऊ गोंदकर.,सोमनाथ कावळे,नरेंद्र सुराणा,वि .ए.प्र.अ.राजेंद्र बर्डे, बर्डे, तुकाराम आलोट,सतिष निकम,तुळशीराम मोरे, कृष्णा आलोट,साई आलोट आदि कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

