जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुलाखतीतील बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो का लावता या वक्तव्याला आक्षेप घेताना मग तुम्ही मोदींचा फोटो का लावला निवडणुकीत असा प्रश्न विचारला, सुधीर भाऊ वरिष्ठ भाजप नेते आहेत मात्र सध्या मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर नाही , उद्धव साहेब हेच म्हणत आहेत आम्ही युती असताना बाळासाहेब आणि अटलजी अडवाणीजी आणि पंतप्रधान म्हणून मोदीजींचे फोटो वापरले , आम्ही तेव्हा भाजप आमचाच पक्ष असे म्हणालो नाही , भाजप फोडायलाही गेलो नाही , आता जे भाजपच्या जोरावर राजकारण करून शिवसेना गिळायला बघत आहेत ते बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा फोटो लावून राजकारण करत आहेत.
आता त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे मग त्यांना बाळासाहेबांचा फोटो लावण्याची का आवश्यकता भासते , त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा आणि मोदींच्या नावाने मतें मागवीत , अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केली आहे .

