कर्जत । प्रतिनिधी :-
कुळधरण पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती जमाती महिला साठी राखीव झाला असुन अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर या गणातुन अनुसूचित जाती जमाती वर्गातील महीलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
या जागेसाठी भारतीय जनता पार्टी चे चिटणीस श्री. गोविंद तांदळे यांच्या भावाच्या सुनबाई सौ स्नेहा महेश तांदळे ह्या प्रबळ दावेदार आहेत.
श्री. गोविंद तांदळे हे गेली पंधरा वीस वर्षांपासून भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन कार्यरत आहेत.समाजातील सर्व घटकांपर्यंत ते पोहचलेले असुन भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना गरजुंपर्यंत पोहचविण्याचे कार्ये आजपर्यंत ते करत आहेत.याशिवाय कुळधरण, शिंदे, कोपर्डी, बिटकेवाडी भोसे रुईगव्हण नांदगाव कुळधरण गणातील सर्व गावात ते परिचित आहेत तसेच तालुका स्तरावर सुद्धा त्यांचा चांगला परिचय आहे. व कुळधरण गणातील समस्यांची जाण चांगल्या प्रकारे त्यांना आहे.एक सुशिक्षित व सामान्य घरातील, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पण समाजाभिमुख नेतृत्व असून ते वडार समाज संघटनेचे (Occi) चे प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा प्रणित विमुक्त घुमूंतु जनजाती विकास परिषद चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतात म्हणुन त्याच्या कार्याचा विचार करून त्यांच्या भावाच्या सुनबाई स्नेहा महेश तांदळे यांना उमेदवारी मिळावी व मिळालेली संधीचे ते समाजासाठी नक्कीच उपयोग करतील. त्याच प्रमाणे सौ. स्नेहा महेश तांदळे यांचे सासरे श्री. गोविंद तांदळे हे भारतीय जनता पार्टी चे निष्ठावंत व प्रा.राम शिंदे साहेब यांचे एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून कर्जत तालुका व बारडगांव जिल्हा परिषद गट व कुळधरण पंचायत समिती गणामध्ये त्यांची ओळख आहे.
आत्तापर्यंत माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी तालुका चिटणीस, बुथप्रमुख जबाबदारी दिली आहे ,ती त्यांनी अतिशय योग्यरीत्या पार पाडली.तसेच पक्षाचे ध्येय, धोरणे, तसेच शासनाच्या विविध योजना आजपर्यंत गरजू नागरिकांपर्यंत पोहोच केल्या आहेत व त्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून दिला आहे. मागील दोन वर्षात कोरोना आजाराने हाहाकार माजवला होता त्यावेळी आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरणासाठी प्रयत्न करून केंद्र शासनाचे लसीकरण चा लाभ गरजू नागरिकांना मिळवून दिला.
तसेच अनेक वयोवृद्ध ,ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळवून दिला. शासनाने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांसाठी शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला . तसेच अनेक प्रश्नांवर रस्त्यांच्या प्रश्नअसतील ,सामाजिक,पाण्याचे व कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील या प्रश्नावर नेहमीच आवाज उठविला.गोविंद तांदळे यांचे सामाजिक कार्य करण्याची जिद्द, चिकाटी पाहता व भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून व त्यांच्या भावाच्या सुनबाई सौ स्नेहा महेश तांदळे ह्या एक सुशिक्षित आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता त्याच्या सुनबाई सौ. स्नेहा महेश तांदळे या कुळधरण पंचायत समिती गुणाच्या प्रबळ उमेदवार म्हणून दावेदार आहेत तरी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने या बाबीवर विचार करून गोविंद तांदळे यांच्या सुनबाई सौ स्नेहा महेश तांदळे यांना कुळधरण पंचायत समिती गणाची उमेदवारी एक सक्षम महिला सुशिक्षित उमेदवार म्हणून उमेदवारास प्राधान्य देण्यात येऊन त्यांना उमेदवारी देण्यात यावी ही विनंती.

