shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विजय नगरकर यांचा सत्कार...!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :  येथील क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सिटिझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा श्रीरामपूर मुद्रक संघ आणि महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष विजय नगरकर यांचा शिवपार्वती मंगल कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी सिटिझन्स जस्टिस प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेशभाई सावंत,सरचिटणीस  राजाभाऊ नारायणे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी (सर), मराठा सेवा संघाचे श्री,संजय जी झिंजाड, शौकत शेख, तालुका रेशन दुकानदार  (महाराष्ट्र शॉपकिपर) संघटनेचे माणिकराव जाधव, पत्रकार अन्सार शेख, संपादक अमोल भाऊ शिरसाठ, प्रहारचे सागर धुपाटी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नागेशभाई सावंत यांनी श्री.नगरकर यांच्या,सामाजातील विविध सामाजिक कार्यांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
तर शेवटी विजय नगरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
close