shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डासच डास चोहिकडे डेंगु मलेरिया सगळीकडे केज नगर पंचायतची फवारणी गेली कोणी कडे..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:- 

पाऊस , चिखल , रिकाम्या जागी मोक्कार झाडी , कॉग्रेस गवत , रुटीची झाडे , डुकराचा वावर अन नुसते डासच डास असा विचित्र प्रकार सध्या केज शहरात सगळीकडे दिसून येत आहे. 


केज शहरातील शिक्षक काॅलनी मध्ये तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत पण रस्ता दुरूस्त करणेगरजेचे असताना साधा मुरूम किंवा खडी सुद्दा टाकली जात नाही.

आधीच कोरोनाचा प्रभाव त्यात पावसाळा त्यामुळे रस्त्याच्या कडेला नालीच्या बाजुला घाणीचे साम्राज्य पसरले असून सगळीकडे डासच डास झाले आहेत त्यामुळे आता डेंगुचे रुग्ण वाढण्याची शक्यता वाढली असून डेंगुच्या लक्षण असलेल्या रुग्णाची संख्या वाढायला लागली आहे तसेच सध्या दवाखान्यात रुग्ण संख्या पण वाढायला लागली आहे डेंगु मलेरिया थंडी ताप रुग्ण वाढत असून या परिस्थितीत साथीच्या रोगाची लागण होण्याची पण शक्यता असते अस तज्ञ सांगतात . यासाठी फवारणी धुरळणी होणे आवश्यक असते परंतु तशी सुविधा कदाचित नगर पंचायत कडे नसावी म्हणून अद्याप पर्यत अशी काही व्यवस्था केल्याचे दिसून येत नाही . 

केज शहर वाढीची  अवाढव्य व्याप्ती पाहता शहरात जर साथीची लागण झाल्यास शहरात किती व कशी परिस्थिती निर्माण होऊ शकते हे अकल्पनीय आहे म्हणून आता केज  शहरात फवारणी होणे आवश्यक आहे .
close