शिर्डी । प्रतिनिधी :-
सन्मा.खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असलेल्या श्रीसाई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप, सोसायटी,ली. शिर्डीचे मा.चेअरमन तथा विद्यमान संचालक श्री. तुषारदादा शेळके पा.यांनी सन्मा.खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामगार हिताचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल राजा विरभद्र मंदिर बिरोबा बन येथे श्रावणमासानिमित्त सुरु असलेल्या श्रीविठ्ठल बिरूदेव पारायण सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या बिरोबा बन येथील कामगारांनी श्री.तुषारदादा शेळके पा.यांचा घोंगडी,काठी आणि पगडी देऊन सत्कार केला.
सदर प्रसंगी राजा विरभद्र यांचे निस्सीम भक्त असलेले शिर्डीतील प्रसिद्ध उद्योजक श्री. मनोज शेठ लोढा,शिर्डी विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. बाळासाहेब काटकर, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.साहेबराव काटकर, म्हाळोबा मंदिर दूध डेअरीचे व्हा.चेअरमन श्री. रंभाजी बनकर, जनकल्याण पतसंस्था शिर्डीचे व्हा. चेअरमन श्री. योगेश काटकर, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे सहसचिव श्री. विलास वाणी, तसेच रावसाहेब बनकर, गणेशराव जगताप, रमेश भाकरे, बाबासाहेब गिधाड, दगु बनकर, नाना बर्डे, कैलास धुळसैंदर, मच्छिन्द्र शिंदे, ठकाजी काटकर,नवनाथ थोरे, आप्पाजी लिहिणार,संजय महाजन(पत्रकार), दिलीप सुपेकर, देविदास आसने, नितीन महाले, सुदाम गोर्डे, रावसाहेब वाणी,नवनाथ वाघे, नरेंद्र निकम आदी उपस्थित होते.

