shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा पक्ष कार्यकर्त्यांनच्या पाठीशी खंबीर आहे-प्रकाश गाडे

      महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भाजपा सोशल मिडियाच्या कार्यकर्त्यांनचा खूप छळ झाला असून अनेक केसेस झाल्या आहे मात्र भाजपा पक्ष कार्यकर्त्यांनच्या पाठीशी खंबीर आहे. असे मत भाजपा सोशल मिडिया सेल प्रदेशाध्यक्ष प्रकाश गाडे यांनी व्यक्त केले.

शिर्डी भारतीय जनता पार्टी, उत्तर व दक्षिण नगर जिल्हा सोशल मीडिया सेल ची बैठक आज येथे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र  गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या प्रसंगी सोशल मीडिया विभाग संयोजक श्री. समीर अंबोरे,उत्तर जिल्हा संयोजक श्री. भाऊसाहेब वाकचौरे, दक्षिण जिल्हा संयोजक श्री. गणेश जयभाये, उत्तर नगर जिल्हा प्रसिद्धी  प्रमुख राम आहेर, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

       श्री. गाडे बोलताना पुढे म्हणाले की, सोशल मीडियाच्या कार्यकर्ते यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चांगल्या योजना जनतेत पोहचवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गोरगरीब जनतेच्या साठी अनेक योजना राबविल्या आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबी हटाव चा नारा दिला पण त्यासाठी काहीही केले नाही. आज जनतेला ज्या योजना मिळतात त्या मोदींच्या नावाने ओळखले जातात. मोदीचे पैसे, मोदींचे धान्य, मोदींचे घरकुल, मोदींचा गॅस असा सामान्य गरीब जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री जेल मध्ये गेले असून एक मंत्री जितेंद्र आव्हाड याला अनंत कुरमुसे प्रकरणात जेल मध्ये घालायचं आहे. तर संजय राऊत याचे दिवस भरले आहे. पत्रा चाळ प्रकरणात सहाशे मराठा माणस बेघर केले आहे. निलेश भामरे याला या सरकारने खूप त्रास दिला मात्र त्याला न्याय देण्याचे काम केले. असेही गाडे यांनी सांगितले.

       भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आपले देशाची सत्ता सोशल मिडिया च्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी बदललेली आहे. सोशल मिडिया हि दुधारी तलवार असून कार्यकर्त्यांनी त्याचा वार करताना आपल्या वर होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
    कार्यक्रम चे स्वागत विभागीय संयोजक समीर अंबोरे यांनी प्रास्ताविक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

 आभार जिल्हा सहसंयोजक शुभम डावखरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी जिल्हा सहसंयोजक आंनद बुधेकर, लखन बेलदार, यांनी विशेष परिश्रम घेतले. सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक अमोल येवले, सोमनाथ बोरसे, अकोले तालुका संयोजक महेश काळे, संगमनेर तालुका संयोजक नवनाथ वावरे, शहर संयोजक स्वप्नील उपासनी, कोपरगाव तालुका संयोजक कनिफ गुंजाळ, शहर संयोजक पंडित पंडोरे, शिर्डी शहर संयोजक राहुल घुले, सचिन क्षीरसागर, लखन गुंजाळ, महेश वाघे, भैय्या रसाने, प्रतीक वाकचौरे, अनिकेत आवारी, अतुल एखंडे यांनी प्रश्न मांडले त्याला श्री प्रकाश गाडे यांनी उत्तर दिले.
close