shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संतुलीत जीवनासाठी गुरुचे महात्म्य...!

१५८) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता

संतुलीत जीवनासाठी गुरुचे महात्म्य

गुरु लावी वाट..
गुरु दावी वाट..  
गुरु पायवाट...
सोय करी...

 गुरुसी  गाढवाचे..
देऊनिया रूप.. 
साठवावे मनांत 
चंदू म्हणे...

गुरु म्हणजे मार्गदर्शक. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जे मार्गदर्शन मिळते त्यातून आपल्याला यश प्राप्ती होत असते. जीवनात कसे जगावे? काय करावे? याचे मार्गदर्शन गुरु करतो आणि आपण जर कुठे चुकत असलो तेव्हा गुरु आपली वाट बंद करतो,आपला तो मार्ग उपदेशाने बंद करतो. आपला रस्ता बंद करतो. म्हणजेच गुरु लावी वाट!
 अशा प्रकारे गैर कर्म करायला आपल्याला अडथळा करतो यालाच म्हणायचे गुरु लावी वाट...

आपण काहीतरी गैर अथवा चुकीचे करत असलो, काही करत असताना सुचत नसेल, मार्ग सापडत नसेल तर गुरु आपल्याला मार्ग दाखवतो. म्हणजे गुरु दावी( दाखविणे ) वाट  असे म्हणायचे.

आपण जेव्हा एखादे काम करीत असतो तेव्हा चुका होतच असतात यावेळी आपला तोल जाऊ नये किंवा अपयशाने आपण खचून जाऊ नये म्हणून आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्याचे काम गुरु करत असतो. पायवाट म्हणजे आपल्या दोन पावलांनी चालायची वाट. म्हणजेच मर्यादित आणि तोल जाऊन न देता करावयाची कामे. अवास्तव पसारा न करता जीवनाचा मार्ग  तोल सांभाळत चांगल्या पद्धतीने साकारणे याला म्हणतात पायवाटेने चालणे. सोय करणे म्हणजे चांगले करणे.
म्हणजे आपली जीवन जगण्याची, चालण्याची क्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने तोल जाऊ न देता करतो तो गुरु.

हे सर्व केव्हा साध्य होते तर गुरुचे गाढ वाचेने म्हणजे तल्लीन होऊन स्मरण केले. त्याने दिलेल्या मार्गाचा तन्मयतेने स्वीकार केला तर यालाच  गुरुसी गाढ वाचे । देऊनिया रूप।असे म्हणायचे. 
जीवनात सफल होण्यासाठी गुरूच्या उपदेशाचा अंगीकार पूर्णत्वाने करावा उपदेश मनात साठवून ठेवावा...
याचा अर्थ, साठवावे मनांत। चंदू म्हणे।।

लेखक : 
पुण्यरत्न डॉ चंद्रकांत शहासऩे.
देशभक्तकोशकार मोबाईल ९८८१३७३५८५
close