रोटरी क्लब इंदापूरच्यावतीने कालठन जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण , मुलांना गणवेश वाटप व डिजिटल टी.व्ही संचाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले .
इंदापूर प्रतिनिधी:कालठण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांच्या समवेत माजी अध्यक्ष उदय शहा , पद्मसिंह जाधव, माजी अध्यक्ष धरमचंद लोढा डायरेक्टर समीर सूर्यवंशी यांची शाळेला सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान प्राथमिक शाळेतील मुलांना २० गणवेश वाटप केले व यापूर्वी ३४ मुलांना ५ हजार किमतीचे किट याप्रमाणे १ लाख ७० हजार एकूण किंमत व मुलांना सॉक्स वाटप व तीन टीव्ही संच शाळेसाठी दिले आहे. आणि यापुढेही रोटरी क्लबचे अध्यक्ष व सर्व त्यांचे सहकारी यांनी शाळेसाठी फिल्टर प्लांट पाण्याचे व भविष्यात आवश्यक अशा लागणाऱ्या सोयी मदत करण्याचे आश्वासन दिले. रोटरी क्लब मेंबरच्या हस्ते आज वृक्षारोपण व मुलांना गणवेश वाटप व डिजिटल टीव्ही संचाचे फीत कापून उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जगताप, गुरुजी घुले, गुरुजी इंदापूर शिक्षक सोसायटीचे संचालक बोराटे गुरुजी, राऊत मॅडम सर्व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, उपाध्यक्ष प्रमोद चव्हाण, हनुमंत पाटील , महादेव भोई , तानाजी सपकळ, बबन चोरगे, अण्णासाहेब पाडुळे कालठण गावचे माजी सरपंच अण्णासाहेब कोळेकर ग्रामपंचायत सदस्य मधुकर क्षिरसागर, संतोष पाडुळे नागनाथ गायकवाड , गोरख जावळे , सुजित पाटील, सौ. मोनिका सपकळ, सौ. शितल पाडुळे ,सौ विद्या शिरसागर, सौ साधना जगताप, सौ शाईन शेख, सौ यास्मिन काझी, सौ आस्मा शेख , भागवत गायकवाड , अभिजीत शिंदे, पांडुरंग सपकळ, बाळासाहेब पांडुळे, संतोष जगताप माजी सदस्य व इतर उपस्थित होते.

