shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्धव ठाकरे यांना श्रीरामपूर शिवसेनेच्या वतीने समर्थन

श्रीरामपूर | प्रतिनिधी
शिवसेनेत चालणाऱ्या बंडाळीमुळे सामान्य शिव सैनिक गोंधळात असताना मात्र श्रीरामपूर तालुक्यातील शिव सैनिक मात्र उद्धव ठाकरे यांना समर्थन करताना दिसून आले आहेत.

     आमदार, खासदार, नेते कुठेही गेले तरी सामान्य शिव सैनिक मात्र एकनिष्ठ आहे. याची प्रचिती श्रीरामपूर तालुक्यातील शिव सैनिकात दिसून आली.येथील शिव सैनिकांनी शंभर रुपयाच्या स्टँपवर  उद्धव ठाकरे यांना उद्देशून आपल्या सहिनीशी लिहून दिले की माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर ( संविधान ) पुर्ण श्रध्दा आहे.
 तसेच वंदनिय हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वावर अढळ निष्ठा आढळून आली.

या वेळी स्टँप वर सही करताना शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे,युवती सेने जिल्हा प्रमुख नेहा लुंड, उप.ता.प्र.विजय बडाख , प्रदीप वाघ,शरद भणगे,सुनील गायकवाड,देविदास सोनवणे, बाळासाहेब दुधाने,प्रदीप मोहिते,बबनराव उघडे, इम्रान पटेल, समीर शेख,शामराव नाईक ,ज्ञानेश्वर गर्जे, बाळासाहेब गायधने,कैलास भणगे,कैलास पुजारी,शरद डोळसे, पांडुरंग व्यवहारे, युवासेनेचे शुभम ताके, विशाल जाधव,अशोक पवार , यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
close