⚪चंद्रपूर जिल्ह्यातील हडस्ती, चारवट, जुनी चारवट येथे गावाचे सभोवताल 18 जुलैच्या रात्री पासून इरई नदीचे( पुराचे )पाणी असल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता.दरम्यान आज मौजा हडस्ती येथील एका 32 वर्षीय शीला रतन रॉय या गंभीर आजारी (heart attack) असलेल्या महिलेला सुखरुप आणण्यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून मोटर बोट चारवट मार्गे हडस्ती येथे पाठविण्यात आली व रात्री उशिरा एक वाजता त्या आजारी महिलेला मोटर बोटने प्रथम नांदगाव येथे नदीतून आणण्यात आले. व तेथून 108च्या Ambulance ने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. यासाठी बोट चालक राजू निंबाळकर व त्यांचे सहकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक जितेन्द्र सुरवाडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या संपूर्ण यशस्वी कामगिरीत हडस्तीचे पोलिस पाटील किशोर मेश्राम माजी पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे , बल्हारपूर तहसील कार्यालयाचे महसूल लिपिक, गजानन उपरे, अजय गाडगे (लिपिक ) तलाठी अजय नौकरकर यांचे मोलाचे योगदान लाभले. ही संपूर्ण प्रक्रिया बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आली.

