shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभियांत्रिकी या कोर्समुळे शासकीय व निमशासकीय क्षेत्त्रात काम करण्याची संधी - डॉ. क्षितिज घुले पाटील

स्वामी विवेकानंद व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : 
शेवगांव येथील शहिद अब्दुल हमीद शैक्षणिक व बहुऊद्देशिय प्रतिष्ठाण संचलित महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्वामी विवेकानंद व्होकेशल ट्रेनिंग सेंटरचे उदघाटन शेवगांव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पा यांच्या  हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप लांडे पा. होते प्रमुख पाहुणे अरुण पा. लांडे, मौलाना आबेद हाफिज साहब उपस्थित होते.


       यावेळी डॉ. घुले म्हणाले की, स्थापत्य अभियांत्रिकी या कोर्समुळे शासकीय व   निमशासकीय क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होते तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोर्स पूर्ण केल्यानंतर शासकीय ठेकेदार (सु.बे‌.अभियंता) म्हणून , सा.बां. व जिल्हा परिषदमध्ये काम  करण्याची संधी मिळते व स्वतःचे रोजगार उपलब्ध होते, गोरगरीब विध्यार्थ्यांना आपल्या कॅरियरमध्ये शिक्षणाचा मोठा फायदा निश्चित होणार आहे असे घुलेंनी बोलताना सांगितले.
        याप्रसंगी दिलीपराव लांडे पा.यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भारदे विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष हरीष भारदे, उपसरपंच एजाज काझी,डॉ निरज लांडे पा. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल फडके, शहराध्यक्ष कमलेश लांडगे, इरफान पटेल, हाजी फिरोजखान पठाण, दै सकाळचे तालुका प्रतिनिधी सचिन सातपुते, संदीप देहाडराय, मौलाना गणीसाहब , वसंत पालवे,समीर शेख,ताहेर हाफिज साहब,इम्रान शेख, अजिम काझी, संतोष जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अकबर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार अलिम शेख व आभार संस्थापक अध्यक्ष युसुफ शेख यांनी आभार मानले.
close