माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले निमसाखर येथील रणमोडे कुटुंबियांचे सांत्वन
फोटो :- निमसाखर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रणमोडे कुटुंबियांचे सांत्वन केले.
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रणमोडे कुटुंबीयांचे निमसाखर येथे आज मंगळवारी ( दि.२६) सांत्वन केले. रणमोडे यांचे पिताश्री सर्जेराव कृष्णा रणमोडे यांचे वृद्धपकाळाने दिनांक २० जुलै रोजी निधन झाले.
रणमोडे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांनी सर्जेराव रणमोडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी निरा भीमा कारखान्याचे संचालक भागवत गोरे ,पंचायत समिती सदस्य बाबुराव रणवरे, निरा भीमा कारखान्याचे माजी संचालक रणजीत पाटील, माजी उपसरपंच अनिल बोंद्रे, चेअरमन दत्तात्रय चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश रणमोडे, राहुल हुंबे, संजय सूर्यवंशी, मच्छिंद्र रनमोडे, पोपट सावंत, प्रकाश रणमोडे, धनंजय सूर्यवंशी, निलेश मोरे, संजय बर्गे, हरिश्चंद्र बर्गे, विठ्ठल गोरे, अरुण शिरसट.
तसेच रणमोडे कुटुंबातील नानासो रणमोडे, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष युवराज रणमोडे, शिक्षक राजेंद्र रणमोडे व रणमोडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

