पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
राजकीय आरक्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या तमाम ओबीसी वर्गाला न्याय मिळाला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णया संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने आरक्षणाच्या निर्णयाला मान्यता दिल्याने ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात ट्विट करत पंकजाताईंनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "ओबीसी आरक्षण... स्वागत स्वागत स्वागत... आतुरतेने प्रतीक्षा करणार्या समस्त ओबीसींना न्याय..राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर..सरकारचे आभार...आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत..." असं ट्विट त्यांनी केलं आहे. दिल्याने ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात ट्विट करत पंकजाताईंनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "ओबीसी आरक्षण... स्वागत स्वागत स्वागत... आतुरतेने प्रतीक्षा करणार्या समस्त ओबीसींना न्याय..राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर..सरकारचे आभार...आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत..." असं ट्विट त्यांनी केलं आहे.
केजच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा , जेष्ठ भाजपा नेते नंदकिशोर मुंदडा , माजलगाव व केज तालुक्याचे नेते रमेशराव आडसकर व केज भाजपा यांनी पण या निर्णयाचे स्वागत केले आहे


