shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले याचा आनंद - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर-▪️किरण घाटे▪️

आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा लढा सुरु होता. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासीक निर्णय घेत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण बहाल केले आहे. त्यामुळे ओबीसी बाधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली असुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

   


ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेहमी सकारात्मक भुमिका राहिली. ओबीसी समाजानेही त्यांच्या या हक्कासाठी मोठा लढा उभारला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ओबीसी आरक्षणा बाबतच्या निर्णयाने ओबीसी समाजातही उत्साह निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर आलेल्या या निर्णयाचा समाजाला मोठा फायदा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासीक असा हा निर्णय असुन समाजाच्या हिताचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याची प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी दिली आहे.

close