shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मिहान बहुउद्देशीय संस्थाने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात!

चंद्रपूर-▪️किरण घाटे 

-▪️गेल्या सात आठ दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस झाला.याच पावसामुळे नदी नाले तुडुंब भरली. दरम्यान अनेक जणांना पूरामूळे  जबर फटका बसला.शहरातील रहमत नगर , आला हजरत ,गिलाल काॅलनी , सिस्टर कॉलनी या भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली बुडाली शिवाय काही नागरिकांच्या घरांतील साहित्यांचे अमाप नुकसान झाले.एका मुलाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.




त्या कुटुंबाच्या घरातील सर्व फर्निचर व खाण्या पिण्याच्या सामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.घरात ठेवलेले अन्नधान्य खाण्याजोगे राहिले नाही.तर दुस-या एका परिवारातील एका ठेकेदाराचे घर सुध्दात पुराच्या पाण्याने वेढले होते.त्यांचे लाखों रुपयांच्या सिलींग सामानाचे या पूर बुडीतीत नुकसान झाले.अश्या कठीण परिस्थितीत येथील स्थानिक मिहान बहुउद्देशीय संस्थाच्या एका टीमने नुकतीच भेट देवून त्यांना सामाजिक बांधिलकीतून  मदतीचा हात दिला.या वेळी मिहान बहुउद्देशीय संस्थांच्या अध्यक्षा परविन सय्यद, अंजली दरेकर , मुमताज शेख , शमशाद शेख , फातिमा शेख, साहिल शेख , रुईना खान ,आदीं उपस्थित होत्या.

close