स्वर प्रिती कला अकादमीचा पुढाकार !
चंद्रपूर-◼️किरण घाटे ◼️
राजूरा स्वर प्रिती कला अकादमी तर्फे गुरू पौर्णिमा काल साजरी करण्यात आली.सुगम संगीताचे शिक्षण घेणा-या स्वर प्रितीच्या विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरंभी
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व तुळशी रोपांचे पूजन करून "वंदे मातरम" या गीताने उपरोक्त कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थान स्वर प्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी विभुषित केले होते तर मार्गदर्शिका म्हणून अल्का सदावर्ते या उपस्थित होत्या.या शिवाय महाराष्ट्र राज्य नेफडोचे अध्यक्ष बादल बेले, स्वतंत्र कुमार शुक्ला ,सुषमा शुक्ला JCI, मोहनदास मेश्राम, व नक्कावार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
◼️अल्का सदावर्ते यांच्या मार्गदर्शनात सुगम संगीत शिकणांऱ्या शिष्यानी रागांवर आधारित गीत व प्रार्थना गीत सादर करून उपस्थितांची या वेळी मने जिंकली.
▪️बादल बेले यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून स्वर प्रितीच्या उपक्रमाची प्रशंसा केली.त्याचे गुरू सदावर्ते अल्का सदावर्ते यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
प्रस्तावनेत सदावर्ते यांनी स्वर प्रितीचे उपक्रम व सुगम संगीत या बाबत माहिती दिली या प्रसंगी त्यांनी गुरू प्रार्थनेचे गायन केले.
▪️स्वतंत्र कुमार शुक्ला, सुषमा शुक्ला, मोहनदास मेश्राम,रत्नाकर नाक्कावार,लिना प्रतापवार, वैशाली येगीनवार, सुनीता कुंभारे,नंदिनी देशमुख, लता ठाकरे, सूनयना तांबेकर, लता कुळमेथे यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून "संगीत हे मनाचे औषध आहे, ते जितके जास्त घेणार तितके लाभदायक ठरते" असा संदेश दिलीप सदावर्ते यांनी दिला.
कार्यक्रमचे संचालन राजश्री उपगनलावार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार वैशाली येगीनवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रचना उपगनलावार, कु .वरदा देशकर, कु .स्वरा मारोटकर, कुमार साहस इंगळे, कु. पेरी विरमलवार, स्वरूपा झंवर,विणा देशकर, प्रतिभा भावे, वनमाला परसुटकर, अंजली गुंडावार, वर्षा वैद्य यांनी परीश्रम घेतले
"तन मन धन से " या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.




