शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक १५ जुलै २०२२
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य कर्करोग तज्ञ संघटनेची सातव्या वार्षिक वैद्यकीय परिषदेचे आयोजन..!!
शिर्डी : महाराष्ट्र राज्य कर्करोग तज्ञ संघटनेची सातवी वार्षिक वैद्यकीय परिषद १५ ते १७ जुलै दरम्यान शिर्डी येथे होत आहे या परिषदेत जागतिक कर्करोग नियंत्रण संघटनेचे डॉक्टर अनिल डी क्रुझ ,(जिनिव्हा )जेष्ठ कॅन्सर तज्ञ डॉक्टर पूर्वीश पारिख, यांच्यासह राज्य व देशभरातील २०० कॅन्सर तज्ञ सहभागी होणार आहे. असे परीषदेचे कार्यक्रम संचालक डॉक्टर तुषार पाटील व संयोजक कॅन्सर तज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे यांनी सांगितले.
बारा वर्षापूर्वी डॉक्टर सतीश सोनवणे यांनी मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधून अनुभव घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार सुरू केले आहे त्यांनी ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत कॅन्सर आजाराबाबत प्रबोधन करत जनतेच्या मनातील गैरसमज दूर केले. तसेच कॅन्सर या आजाराबाबत प्रबोधन होण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले.
अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या उपस्थितीत कॅन्सरवर प्रभावी उपचारांनी मात केलेले यांच्या महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घडवून आणत त्यांचं रुग्णांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण केली.
डॉक्टर सतीश सोनवणे यांनी नगरमध्ये केमोथेरपी तज्ञ डॉक्टर तुषार पाटील व रेडीऐशन तज्ञ डॉक्टर भुषण निकम, रोहन खडे यांच्या बरोबर सर्व कॅन्सर निदान व उपचार यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत , अहमदनगर जिल्हायाचे खासदार डॉक्टर सुजयदादाविखे पाटील साहेब यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन शिर्डी येथे होणार आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

