माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भोडणी सोसायटीच्या चेअरमन राजेंद्र भोंगळे व्हाईस चेअरमन आसिफ डांगे यांची निवडी बद्दल पेढे भरवून केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी:भोडणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी राजेंद्र मधुकर भोंगळे तर व्हाईस चेअरमन पदी असिफ बाबूलाल डांगे यांची निवड झाल्या बद्दल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार करून पेढे भरवून अभिनंदन केले.
यावेळी प्रा. चव्हाण. एच.के, सतीश आनपट, सरपंच प्रतिनिधी संतोष जगताप, माजी सरपंच अनिल चव्हाण, माजी सरपंच कैलास हांगे , नवनिर्वाचित सोसायटीचे सदस्य अण्णासो गोसावी ,माणिकराव खाडे, बबनराव गणपत खाडे, अभिजीत खोरे ,बाळासाहेब रणसिंग इत्यादी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भोडणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र भोंगळे व व्हाईस चेअरमन पदी आसिफ बाबूलाल डांगे यांची निवड करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करीत भोडणी गावातील उपस्थित पदाधिकाऱ्यांचे व सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक करीत विशेष अभिनंदन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले असल्याची माहिती प्राध्यापक चव्हाण एच.के. यांनी दिली.

